Friday, May 16, 2025

देशमहत्वाची बातमी

धक्कादायक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू निश्चित

धक्कादायक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू निश्चित

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. सध्या तिसऱ्या लाटेला जबाबदार असणाऱ्या ओमायक्रॉननंतर आता निओकोव्ह (NeoCov) व्हायरस समोर आला आहे. मात्र, हा जुनाच असल्याची माहिती काहींनी दिली आहे. जुन्या विषाणुत म्युटेशन झाल्याने हा नवा प्रकार समोर आला आहे.


२०१९ मध्ये कोविड-१९ विषाणू पहिल्यांदा सापडलेल्या चीनच्या वुहान येथील शास्त्रज्ञांनी दक्षिण आफ्रिकेतील नवीन प्रकारच्या NeoCov बद्दल इशारा दिला आहे. या व्हायरसचा मृत्यू आणि संक्रमण दर मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती संशोधकांनी दिलीय. यासंदर्भात रशियन एजन्सी स्पुतनिकने माहिती दिलीय. MERS-CoV विषाणूशी संबंधित असणारा हा व्हेरिएंट 2012 आणि 2015 मध्ये मध्य पूर्वेकडील देशांमध्ये आढळला होता. त्यावेळी आलेल्या संसर्गजन्य आजाराच्या लाटेत SARS-CoV-2 यांच्यासारख्याच असणाऱ्या विषाणुने डोकं वर काढलं होतं. माणसाला कोरोना होण्याचे हे प्रमुख स्रोत आहेत.


NeoCoV दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये सापडला होता. त्यानंतर फक्त या प्राण्यांमध्ये पसरत असल्याची त्याची ख्याती होती. मात्र, आता नव्याने झालेल्या अभ्यासात NeoCoV आणि त्याचे जवळचे व्हायरस म्हणजे 2180-CoV माणसालाही संक्रमित करू शकतात. वुहान युनिव्हर्सिटी आणि चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्सच्या संशोधकांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.


व्हायरसला मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी फक्त एक उत्परिवर्तन (Mutation) आवश्यक आहे. संशोधकांनी काही निष्कर्ष मांडले आहेत. श्वासोच्छवासाचे आजार असलेल्या किंवा लसीकरण झालेल्या लोकांद्वारे तयार केलेले अँटीबॉडीज किंवा प्रथिनांचे रेणू NeoCoV विरोधात संसर्गापासून संरक्षण करू शकत नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.


चिनी संशोधकांच्या मते, NeoCoV मध्ये MERS-उच्च CoV चा मृत्यू दर जास्त आहे. त्यानुसार प्रत्येक तीन संक्रमित व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आलीय. NeoCoV वरील ब्रीफिंगनंतर, रशियन स्टेट व्हायरोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या तज्ञांनी एक निवेदन जारी केलं, असं अहवालात म्हटलं आहे.


"व्हेक्टर या संशोधन केंद्राला चिनी संशोधकांनी NeoCoV या कोरोना व्हायरससंबंधी गोळा केलेल्या डेटाची माहिती दिली आहे. हा व्हेरिएंट मानवांमध्ये सक्रियपणे पसरण्यास अद्याप सक्षम झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, कोरोनाच्या अँटिबॉडिज यावर काम करत नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात याचं मानवी संक्रमण झाल्यास आव्हानात्मक परिस्थितीला तोंड द्यावं लागेल. संभाव्य जोखमींचा अभ्यास करणे आणि पुढील तपासणी करणे आवश्यक आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. या अहवालानुसार, निओकोव्ह विषाणू नवीन नसल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment