
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत भारतात २ लाख ५१ हजार २०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या पॉझिटिव्हिटी रेट १५.८८ टक्क्यांवर घसरला आहे. तर देशातील सक्रिय रुग्णसंख्या २१ लाख ५ हजार ६११ आहेत. ही आकडेवारी आतापर्यंत नोंदवलेल्या एकूण केसेसपैकी ५.१८ टक्के आहे.
गेल्या 24 तासांत कोविड-19 मुळे देशात 627 मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. दिवसेंदिवस तिसऱ्या लाटेचा आलेख घसरत आहे. मात्र मृत्यूच प्रमाण वाढल्याचं जाणवतंय. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 3,लाख 47 हजार 443 झाली आहे. आज साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेटमध्येही घट झालीय. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 17.47 टक्के. 164.44 कोटी लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.