मुंबईत सात कोटींच्या बनावट नोटांसह सात जण ताब्यात

मुंबई : दहिसर चेकनाक्यावर दोन हजार रुपयांच्या तब्बल सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११ च्या पथकाने केली. यात सात जणांना अटक करण्यात आली असून त्यांना ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपासात या नोटा दिल्लीहून मुंबईत आणल्याचे आरोपींनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीहून दहिसरला एक आंतरराष्ट्रीय टोळी बनावट नोटांचा व्यापार करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने एक पथक नॅशनल पार्क, तर दुसरे पथक दहिसर टोलनाक्याजवळ तैनात केले. ही टोळी ओला गाडीतून नोटा घेऊन जात होती. दरम्यान पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून आरोपींसह बनावट नोटा ताब्यात घेतल्या.


या प्रकरणी चार आरोपींना दहिसर चेकनाक्यावरून, तर तिघांना अंधेरीतून अटक करण्यात आली, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखा युनिट ११ चे पोलीस अधिकारी विनायक चव्हाण यांनी दिली. यावेळी दोन हजार रुपयांच्या ३५ हजार बनावट नोटा जप्त केल्या. तसेच अधिक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून ७ मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, २८,१७० रुपये रोख आणि एक लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहे. दरम्यान आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संग्राम निशानदार यांनी दिली.

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत