हैदराबाद : ज्येष्ठ अभिनेते मेगास्टार चिरंजीवी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
या संदर्भात ट्वीटरद्वारे माहिती देताना चिरंजीवी म्हणाले, “प्रिय मित्रांनो, सर्व काळजी घेऊनही मला सौम्य लक्षणांसह कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मी गृह विलगीकरणात असून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती करतो की, चाचणी करून घ्या, आपणास पुन्हा भेटण्यास उत्सुक.”
मेगास्टार चिरंजीवी सध्या आचार्य, गॉडफादर, भोला शंकर आणि दिग्दर्शक बॉबी उर्फ रवींद्र रेड्डी यांच्या चित्रपटात व्यस्त आहेत. चिरंजीवी पहिल्यांदाच दिग्दर्शक शिवा कोरटाला यांच्यासोबत आचार्य सामाजिक विषयावर आधारित चित्रपटात दिसणार आहेत. दरम्यान १ एप्रिल रोजी ‘आचार्य’ भव्य स्वरूपात प्रदर्शित होणार आहे.