Friday, October 4, 2024
Homeमहत्वाची बातमीमहाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही'; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’; देवेंद्र फडणवीसांचा सरकारला इशारा

मुंबई : वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. दरम्यान, या निर्णयानंतर आता राजकीय वातावरण तापले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार विरोध केला आहे.

‘शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या नशेत धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, असा घणाघात फडणवीसांनी केला.

फडणवीस पुढे म्हणाले, ‘पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त. दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी. महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू. महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -