मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परतल्यानंतर टीम इंडियाचा पुढचा सामना वेस्ट इंडिज क्रिकेट संघाशी मायदेशात होणार आहे. आगामी मालिकेसाठी बुधवारी (२६ जानेवारी) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. मर्यादीत षटकांसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्त झालेल्या रोहित शर्माचे संघात पुनरागमन झाले आहे. ३४ वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डला भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज केमार रोच, एनक्रुमाह बोनर आणि ब्रँडन किंग यांनीही संघात पुनरागमन केले आहे.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी कॅरेबियन संघ
कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्राव्हो, शमाराह ब्रुक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वॉल्श जूनियर.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बुधवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – ६ फेब्रुवारी (अहमदाबाद)
दुसरा एकदिवसीय सामना – ९ फेब्रुवारी (अहमदाबाद)
तिसरा एकदिवसीय सामना – १२ फेब्रुवारी (अहमदाबाद)
टी-२० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-२० सामना – १५ फेब्रुवारी (कोलकाता)
दुसरी टी-२० सामना – १८ फेब्रुवारी (कोलकाता)
तिसरा टी-२० सामना – २० फेब्रुवारी (कोलकाता)