खेळाडूचे आकलन त्याच्या खेळातून व्हावे; कर्णधाराचे आकलन आयसीसीच्या खिताबाद्वारे व्हायला हवे; अनेक मोठ्या खेळाडूंनी विश्वचषक जिंकला नाही; रवी शास्त्री यांचे मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कोहलीची पाठराखण करत म्हटले आहे की, खेळाडूचे आकलन त्याचा खेळ आणि त्याच्या खेळातील योगदानाद्वारे व्हायला हवे, असे ते म्हणाले.
रवी शास्त्री पुढे म्हणाले की, एका कर्णधाराचे आकलन आयसीसीच्या खिताबाद्वारे व्हायला हवे. अनेक मोठ्या खेळाडूंनी विश्वचषक जिंकला नाही. राहुल द्रविड, सौरव गांगुली, अनिल कुंबळे यांनीही विश्वचषक जिंकलेला नाही. त्यामुळे त्यांना काय वाईट खेळाडू म्हणायचे काय? शास्त्री म्हणाले की, भारताकडे किती विश्वचषक विजेते कर्णधार आहेत? सचिन तेंडुलकरही सहाव्यांदा विश्वचषकात यशस्वी झाला. शास्त्री म्हणाले, “मला सांगा की किती संघ इतके सातत्यपूर्ण खेळ करू शकले. अनेक मोठे खेळाडू विश्वचषक जिंकू शकले नाहीत. गांगुली, द्रविड, कुंबळे यांनी एकही विश्वचषक जिंकला नाही. याचा अर्थ ते सगळेच वाईट खेळाडू आहेत असे नाही. तुम्ही मैदानात जाऊन तुमचा खेळ दाखवा.
भारताचे केवळ दोन विश्वचषक विजेते कर्णधार आहेत. सचिन तेंडुलकरही सहाव्यांदा विश्वचषकात यशस्वी झाला. त्यामुळे विश्वचषकावरून कुणाचीही तुलना करू नये.” काही दिवसांपूर्वी रवी शास्त्रींच्या आणखी एका विधानाने खळबळ उडवून दिली होती. त्यांनी कोणाचेही नाव न घेता म्हटले होते की, “विराट कोहलीचे यश काही लोकांना पचनी पडत नाही. शास्त्रींच्या मते, विराट कसोटी क्रिकेटमध्ये आणखी किमान दोन वर्षे कर्णधार राहू शकला असता. या फॉरमॅटमध्ये तो सध्याचा सर्वात यशस्वी भारतीय कर्णधार आहे. भारताला पुढील दोन वर्षांत अनेक घरच्या मालिका खेळायच्या आहेत, त्यामुळे ६० सामन्यांमध्ये ४० विजयांचा विक्रम ५०-६० असा झाला असता. पण कदाचित काहींच्या हे पचनी पडणार नाही.” विराट कोहली आता भारतीय संघात फलंदाज म्हणून भूमिका बजावत आहे. मागील वर्षी झालेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर त्याने टी-२०चे कर्णधारपद सोडले. त्यानंतर बीसीसीआयने त्याची वनडेच्या नेतृत्वावरून हकालपट्टी केली. त्यानंतर बीसीसीआय आणि विराट कोहलीमध्ये आलबेल नसल्याचे समोर आले.