मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयानंतर आता नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे नितेश राणे यांची बाजू मांडणार आहेत.
या निवडणुकीत केंद्रीय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्याेगमंत्री नारायण राणे यांचा करिष्मा राहिला व त्यांचे पॅनल जिंकले. तर अॅडव्होकेट संग्राम देसाई, अॅडव्होकेट राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर आणि उमेश सावंत या वकिलांनी नितेश राणे यांच्यासाठी आपले कायदेशीर कौशल्य पणाला लावले होते.