Wednesday, September 17, 2025

वर्धा अपघात अतिशय दुःखद : देवेंद्र फडणवीस

वर्धा अपघात अतिशय दुःखद : देवेंद्र फडणवीस

मुंबई : वर्धेत वाहन कोसळून झालेल्या अपघातावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केला आहे.

ट्वीटरद्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, " वर्धा जिल्ह्यात वाहन कोसळून झालेल्या अपघातात ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, ही घटना अतिशय दुःखद आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार हा सुद्धा यात होता. सर्व कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो.. ॐ शांती. "

Comments
Add Comment