Tuesday, May 6, 2025

विदेशमहत्वाची बातमी

दक्षिण चीन समुद्रावरून जाताना अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले

दक्षिण चीन समुद्रावरून जाताना अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळले

अमेरिका : दक्षिण चीन समुद्रात उतरताना अमेरिकेचे एक युद्धविमान एन-३५सी कोसळले. या अपघातात सात अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचे अमेरिकन नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. वैमानिकाला विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. नौदलाने सांगितले की, हे विमानाचे नियमित उड्डाण होते.


पायलटला सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्याला अमेरिकन लष्करी हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी नेण्यात आले. त्याचबरोबर जखमींपैकी तीन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लष्कराच्या चार जवानांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. विमान अपघाताचे कारण शोधले जात असल्याचे नौदलाने सांगितले

Comments
Add Comment