नवी दिल्ली : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी निवडणूक आयोग आणि मतदारांना महत्वाचे आवाहन केले आहे. सध्याची मतदानाची टक्केवारी पाहता यात सुधारणा होण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज निवडणूक आयोग आणि नागरिकांना पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ७५ टक्के मतदान होईल हे सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं तसेच निवडणूक लोकशाही अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी आणि एकाचवेळी निवडणूका घेण्यावर एकमत घडवून आणण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.