Saturday, May 10, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

प्रजासत्ताक दिनानिमित्त किचन कल्लाकारच्या मंचावर खास पाहुणे

प्रजासत्ताक दिनानिमित्त किचन कल्लाकारच्या मंचावर खास पाहुणे

मुंबई : झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांची किचनमध्ये उडालेली तारांबळ पाहायला मिळते. या आठवड्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त कलाकार नाही तर काही सुप्रसिद्ध खास पाहुणे या किचनमध्ये महाराजांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज होणार आहेत. ॲड. उज्ज्वल निकम - प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ व विशेष सरकारी वकील, कृष्ण प्रकाश - आयपीएस अधिकारी, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड आणि राही सरनोबत - ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय खेळाडू या खास पाहुण्यांमध्ये किचन कल्लाकारच्या किचनमध्ये चुरस रंगणार आहे.


वकील म्हणून आपल्या अशिलाची बाजू अगदी निर्भीडपणे मांडणाऱ्या ऍडव्होकेट उज्वल निकम यांना किचनमध्ये मात्र जिलेबी करण्याच्या आव्हानाला सामोरं जायचं आहे.


इतकंच नव्हे तर राहीचा नेम किती अचूक आहे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे शेठकडून सामान मिळवण्यासाठी किचन कल्लाकारच्या किचनमध्ये राहिला आपली नेमबाजी दाखवावी लागणार आहे.


याचसोबत आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश हे किती तल्लख आहेत याची प्रचिती प्रेक्षकांना येणार आहे कारण शेठकडून सामान मिळवण्यासाठी स्क्रिनवर भरधाव असलेल्या गाड्यांचे नंबर अचूक सांगण्याचं आव्हान त्यांनी लीलया पेललं.


आता या तिघांमध्ये महाराजांना आपल्या पाककलेने कोण खुश करेल आणि किचन कल्लाकारचा किताब कोण मिळवेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Comments
Add Comment