Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

पंतप्रधानांकडून वर्धा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत

पंतप्रधानांकडून वर्धा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाखांची मदत

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सेलुसरा येथे झालेल्या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला.

दरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर या अपघातात जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "महाराष्ट्रात सेलुसरा येथील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे तीव्र दुःखी आहे. ज्यांनी आपल्या जवळच्यांना गमावले आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातील जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो.

Comments
Add Comment