
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदार गौतम गंभीरला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, अशी मी विनंती करतो, असे ट्विट करत गौतम गंभीरने सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.