नवी दिल्ली : देशात आज नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे २ लाख ५५ हजार ८७४ नवे रुग्ण आढळून आले असून ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारच्या आकडेवारीत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये १६ टक्क्यांनी घट झाली आहे.
सध्या देशात २२ लाख ३६ हजार ८४२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत २ लाख ६७ हजार ७५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर करोनातून बरे झालेल्यांची संख्या ३ कोटी ७० लाख ७१ हजार ८९८ झाली आहे. सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट १५.५२ टक्के आहे.