Tuesday, April 22, 2025
HomeदेशOMG! ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 भारतात आला

OMG! ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 भारतात आला

नवी दिल्ली : ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट धडकली असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांनी रुग्णसंख्येच्या पीकचा टप्पा पार केला असून आता इतर शहरे व ग्रामीण भागात संसर्ग वेगाने फैलावत आहे. अशावेळी चिंतेत आणखी भर घालणारी माहिती हाती आली आहे.

देशात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा समूह संसर्ग सुरू झाला आहे आणि त्याचवेळी ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 भारतातील अनेक भागांत फैलावला असल्याची चिंतेत भर घालणारी माहिती भारताच्या सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियम यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.

‘जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचा वेगाने फैलाव होत आहे. त्यात भारतात कोरोना आणि ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता ओमायक्रॉन व्हेरिएंटने समूह संसर्गाची स्टेज गाठली आहे. महानगरांमध्ये या संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव दिसत आहे. तिथे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे’, असे सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियमच्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले आहे. ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 बाबत या बुलेटिनमध्ये महत्त्वाची माहिती दिली गेली आहे. हा सब व्हेरिएंट देशातील बऱ्याच भागांत आढळून आला आहे, असे नमूद करत सावध करण्यात आले आहे. १० जानेवारीचे हे बुलेटिन रविवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भारतासाठी BA.2 आहे धोकादायक

  • कोलकाता येथे सहा दिवसांतील ८० टक्के नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 आढळून आला आहे. २२ ते २८ डिसेंबर दरम्यान जीनोम सीक्वेन्सिंगसाठी हे सर्व नमुने पाठवण्यात आले होते.
  • BA.2 हा छुपा विषाणू म्हणता येईल. केवळ जीनोम सीक्वेन्सिंगच्या माध्यमातूनच त्याची लागण झाली आहे की नाही हे कळू शकते. यात BA.1, BA.2 आणि BA.3 असे तीन उपप्रकार आहेत.
  • BA.2 हा अजून ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ मानला गेलेला नाही. वैज्ञानिक सध्या याचा अभ्यास करत आहेत. त्याचवेळी सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन मात्र करण्यात आलेले आहे.
  • ब्रिटनमध्ये या सब व्हेरिएंटचे ४२६ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत भारतासह ४० देशांत BA.2 चा फैलाव झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -