Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

ताडदेवमधील २० मजली कमला इमारतीत भीषण आग; सात जणांचा मृत्यू

ताडदेवमधील २० मजली कमला इमारतीत भीषण आग; सात जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमधील ताडदेव भागातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंग या २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


या दुर्घटनेत आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, १५ जण जखमी झाले असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे, तर अन्य जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.


आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या कुलिंगचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. तर, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाटिया रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे देखील सांगितले जात आहे.

Comments
Add Comment