दिल्लीतील राजपथावर अखेर महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी

  91

नवी दिल्ली : केंद्राने आपला निर्णय बदलला असून आता राजपथावरील संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. यंदा प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार होता. परंतु सुरक्षेच्या कारणावरून केंद्र सरकारने या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आली होती.


महाराष्ट्राच्या चित्ररथावर यंदाच्या देखाव्यातून राज्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवले जाणार आहे. जैवविविधतेची मानके या विषयावर आधारित चित्ररथ तयार करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यप्राणी, राज्यपक्षी यांसह महाराष्ट्रात आढळणाऱ्या विविध सजीव प्रजातींचा समावेश असणार आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ हा नेहमीच राजपथावरील संचलनाचे आकर्षण राहिला आहे. आता महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा सर्वोत्तम ठरणार का, हे देखील पाहावे लागेल.


दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या रथालाही परवानगी नाकारली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच त्यांना पत्रही पाठवले होते. ममता यांनी आपल्या पत्रात, केंद्र सरकारच्या अशा वागण्यामुळे लोकांना धक्का बसला आहे. देशाला 75 वर्ष पूर्ण होत असताना देशातील स्वातंत्र्य सेनानींच्या योगदानावर आधारित चित्ररथाला जागा न मिळणे हे संतापजनक असल्याचं म्हटंल होतं.


२६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात देशातील प्रत्येक राज्याच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी २०१५ नंतर दोन वेळा सर्वोत्तम चित्ररथाचा किताब पटकवला आहे. २०१५मध्ये 'पंढरीची वारी' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता.

Comments
Add Comment

जीएसटीच्या १२ टक्के स्लॅबमध्ये बदलाची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मुलाखतीत दिले संकेत

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२ टक्के जीएसटी स्लॅबमधील वस्तूंचा ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये समावेश करण्याची तयारी

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पाच देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत, या दरम्यान ते ब्रिक्स शिखर

नॅशनल हेरॉल्ड : ५० लाखात बळकावली २ हजार कोटींची मालमत्ता, राहुल आणि सोनिया गांधींसंदर्भात ईडीचा कोर्टात दावा

नवी दिल्ली: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधींनी ५० लाखात २ हजार कोटींची मालमत्ता

केंद्रीय कृषीमंत्री २ दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे ३ आणि ४ जुलै रोजी

खासगी दुचाकींना बाईक टॅक्सी सेवा देण्यास केंद्र सरकारची परवानगी

नवी दिल्ली : देशात प्रथमच केंद्र सरकारने खासगी वापरासाठी नोंदणीकृत दुचाकींना राईड-हेलिंग अ‍ॅग्रीगेटर

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद