मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांनी ”व्हाय आय किल्ड गांधी” या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे. या चित्रपटात गोडसेची भूमिका साकारली म्हणून काही जण कोल्हे यांचे समर्थन करत आहेत. तर, काही जण कडाडून विरोध करत आहेत. अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कोल्हे यांना पाठिंबा देत आपले मत मांडले.
अमोल कोल्हे यांनी केवळ अभिनय केला. अभिनय केल्याने नथुराम गोडसेच्या विचारांचं समर्थन केलं, असं होत नाही’, अशी प्रतिक्रिया देत नाना पाटेकर यांनी कोल्हे यांची पाठराखण केली आहे. मी देखील ‘लास्ट व्हाईस रॉय माउंट बॅटन’ या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका केली आहे. कुणी कोणती भूमिका करावी हा त्यांचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.