Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीपुण्यातील सर्व शाळा, कॉलेज बंदच राहणार

पुण्यातील सर्व शाळा, कॉलेज बंदच राहणार

पुणे : राज्यातल्या सर्व शाळा येत्या सोमवारपासून २४ जानेवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरीही कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता रिस्क नको म्हणून पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्यात येणार आहेत. आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शाळांसंबंधीची माहिती सोशल मिडीयाद्वारे दिली. त्यांनी ट्विट करत सांगितले की, ‘कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला. पुढील बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.’

दरम्यान, राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राथमिकता असून कोविडविषयक मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

दुसरीकडे, राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीआधी सुरू करण्याबाबत विचार सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -