
नवी दिल्ली : देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होताना दिसते आहे. त्यातच काल पुन्हा देशात नवे कोरोना 3,47,254 रुग्ण आढळले आहेत. परवाच्या तुलनेत तब्बल 29,722 अधिक रुग्ण आढळले आहेत. तर मागच्या 24 तासांत तब्बल 703 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 20,18,825 सक्रीय रुग्ण आहेत. तर सध्याच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधित होण्याचा दर 17.94 टक्क्यांवर पोहोचला आहे.
https://twitter.com/ANI/status/1484372644795645953
देशात कोरोनामुक्त होण्याऱ्यांची संख्याही चांगली असल्याने दिलासा मिळाला आहे. काल दिवसभरात 2,51,777 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांत सर्वाधिक सक्रिय रूग्ण आढळत असून ही चिंताजनक परिस्थिती असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काल सांगितले.