Sunday, September 14, 2025

पाच वर्षाखालील बालकांना मास्कची गरज नाही

पाच वर्षाखालील बालकांना मास्कची गरज नाही

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षा घेता केंद्र सरकारने मुले आणि किशोरवयीन वयोगटासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आता ५ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस नाही, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार ६ ते ११ वयोगटातील मुले पालकांच्या देखरेखीत मास्कचा वापर करू शकतात तर १२ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील मुलांनी मास्क वापरला पाहिजे, असे स्पष्टपणे मार्गदर्शक तत्वे मध्ये सांगितले आहे.

कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही.

Comments
Add Comment