Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

कोरोना आटोक्यात न आल्यास कठोर निर्बंध

कोरोना आटोक्यात न आल्यास कठोर निर्बंध

नाशिक (प्रतिनिधी)- राज्य टास्क फोर्स आणि मुख्य सचिवांनी घेतलेल्या आढाव्यात कोरोना रुग्णांची संख्या दीडपट वाढण्याची भीती व्यक्त केली होती. नाशिक जिल्ह्यात आता तो अंदाज खरा ठरताना दिसत आहे. जिल्ह्यात तब्बल दिवसाला तीन-तीन हजार रुग्ण सापडत असल्याने जिल्हा प्रशासन हादरून गेले आहे. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत इशारा दिला आहे.

कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात प्रशासन कोणतीही कसर ठेवत नसताना नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून आपली जबाबदारी सुद्धा पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अन्यथा आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असा इशाराही दिला आहे.

शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये मोठया प्रमाणावर मोठी गर्दी पहायला मिळत आहे. शिवाय निर्बंध असूनही वीकेंडला पर्यटनस्थळांवरही गर्दी होत आहे. अनेकजण विनामास्क फिरतानाही दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे. दरम्यान वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाकडून नाशिककरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामीण भागातही कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. दक्षतेचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात सोळा कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहेत. शिवाय ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधा आहे. कोरोनाची सद्यस्थिती पाहता जिल्हाधिकार्यांनी वॉर रूम तयार केला असून प्रत्येक अधिका-यांना त्यांच्या जबाबदारी निश्चित करून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >