नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झाली. बुधवारी दिवसभरात ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात ३ लाख १७ हजार ५३२ रुग्ण सापडले आहेत. भारतात गेल्या वर्षी १५ मे रोजी ३ लाखांहून जास्त रुग्णांची नोंद झाली होती. तिसऱ्या लाटेत २९ डिसेंबरला १० हजार रुग्ण सापडले होते, त्यानंतर फक्त २३ दिवसात रुग्णसंख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी एका दिवसात ३ लाख रुग्णांची नोंद ६० दिवसांनी झाली होती.
India reports 3,17,532 new COVID cases, 491 deaths, and 2,23,990 recoveries in the last 24 hours.
Active case: 19,24,051
Daily positivity rate: 16.41%9,287 total Omicron cases detected so far; an increase of 3.63% since yesterday pic.twitter.com/L4KnawIEAd
— ANI (@ANI) January 20, 2022
देशात सध्या १९ लाख २४ हजार ५१ सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट सध्या १६.४१ टक्क्यांवर आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९३.६९ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासांत देशात ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात सध्या ओमायक्रॉनचे ९ हजार २८७ रुग्ण आहेत. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ओमायक्रॉन रुग्णांमध्ये ३.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आतापर्यंत ३ कोटी ५८ लाख ७ हजार २९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ४ लाख ८७ हजार ६९३ जणांना या जीवघेण्या आजारामुळे जीव गमवावा लागला. दुसरीकडे राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १५९.६७ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. जानेवारीत भारत आणि अमेरिकेशिवाय अर्जेंटिना हा एकमेव देश होता जिथं एका दिवसात एक लाख रुग्ण आढळले होते. अमेरिका, रशिया, कॅनडा, मेक्सिको आणि पॉलंड या देशांच्या तुलनेत भारत मृत्यूदर कमी आहे.