मंडणगड : मंडणगड नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रवादी शिवसेना महाआघाडीचे ७ उमेदवार, शिवसेना बंडखोर गटातर्फे शहर विकास आघाडीचे ७ उमेदवार यासह ३ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताकारणाची चावी अपक्षांच्या हातात गेलेली आहे.
निवडणुकांचे तोंडावर करण्यात आलेल्या महाआघाडीचा प्रयोग शहरातील सुमारे पन्नास टक्के मतदारांनी नाकारलेला दिसून आला. शहरातील मुळ शिवसेनेचे चारही अधिकृत उमेदवार या निवडणुकीत पराभुत झाल्याने अधिकृत शिवसेनेचा शहरातील पत्ता साफ झालेला दिसून आला. याचबरोबर आमदार योगेश कदम यांच्या पाठींब्याने शिवसेनेच्या बंडखोर शहर विकास आघाडीने निवडणुकीत जोरदार मुसंडी मारलेली दिसून आली.
मतमोजणी प्रक्रीया शांततेत संपन्न होण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा विभागीय अधिकारी भाग्यश्री मोरे, तहसिलदार नारायण वेगुर्लेकर, निवासी नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे, पोलीस निरिक्षक शैलजा सावंत, उत्तम पिठे यांच्या नियोजनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मंडणगड नगरपंचायत प्रभाग निहाय निवडणुक निकाल खालीलप्रमाणे आहे.
प्रभाग क्रमांक 1 आदर्श नगर
सुमित्रा निमदे (अपक्ष) मते 62
सोनल बेर्डे (अपक्ष) मते 62
पुजा सापटे(शिवसेना) मते 57
मते समान झाल्याने चिठ्ठीवर अपक्ष उमेदवार सोनले बेर्डे विजयी.
प्रभाग क्रमांक 2 बोरीचा माळ
सेजल गोवळे (अपक्ष) मते 123
श्रध्दा चिले (शिवसेना) मते 54
शाहीन सय्यद(राष्ट्रवादी)मते102
अपक्ष उमेदवार सेजल गोवळे विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक 3 केशवशेठ लेंडे नगर
प्रियांका लेंडे (राष्ट्रवादी) मते 95
नम्रता पिंपळे (अपक्ष)मते 61
राष्ट्रवादी प्रियाका लेंडे विजयी झाल्या.
प्रभाग क्रमांक 4 शिवाजी नगर
मुश्ताक दाभिळकर(अपक्ष)मते 117
दिपक घोसाळकर(राष्ट्रवादी)मते 63
श्रीपाद कोकाटे (काँग्रेस) मते 33
अपक्ष उमेदवार मुश्ताक दाभिळकर विजयी
प्रभाग क्रमांक 5 साईनगर
योगेश जाधव (अपक्ष) मते 129
राजाराम लेंढे(राष्ट्रवादी) मते 94
अनुराग कोंळबेकर(भाजपा)01
अपक्ष उमेदवार योगेश जाधव विजयी.
प्रभाग क्रमांक 6 दुर्गवाडी 2
सुभाष सापटे (राष्ट्रवादी) मते 102
नरेश बैकर (अपक्ष) मते 65
राष्ट्रवादी सुभाष सापटे विजयी
प्रभाग क्रमांक 7 सापटेवाडी
संजय सापटे(शिवसेना)मते 49
निलेश सापटे(अपक्ष) मते 54
महेंद्र सापटे(अपक्ष) मते 16
अपक्ष उमेदवार निलेश सापटे विजयी.
प्रभाग क्रमांक 8 दुर्गवाडी 1
राजेश्री सापटे(राष्ट्रवादी)मते 74
प्रिया पोस्टुरे (अपक्ष) मते 62
राष्ट्रवादीच्या राजेश्री सापटे विजयी.
प्रभाग क्रमांक 9 भेकतवाडी
अश्विनी गोरीवले (शिवसेना)मते 55
प्रमिला किंजळे(अपक्ष)मते 65
अपक्ष उमेदवार प्रमिला किंजळे विजयी
प्रभाग क्रमांक 10 कोंझर
मुकेश तलार (राष्ट्रवादी) मते 70
विश्वदास लोखंडे (भाजपा) मते 24
मंदार वारणकर(मनसे) मते 00
राष्ट्रवादीचे मुकेश तलार विजयी.
प्रभाग क्रमांक 11धनगरवाडी
विनोद जाधव(अपक्ष) मते 89
तुषार साठम(शिवसेना) मते 17
अपक्ष उमेदवार विनोद जाधव विजयी
प्रभाग क्रमांक 12 तुरेवाडी-कुंभारवाडी
मनिषा हातमकर(राष्ट्रवादी)मते 59
पुर्वा जाधव (अपक्ष)मते 45
राष्ट्रवादीच्या मनिषा हातमकर विजयी.
प्रभाग क्रमांक 13 बौध्दवाडी 1
आदेश मर्चंडे (अपक्ष) मते 47
सुप्रिया मर्चंडे(अपक्ष) मते 40
अपक्ष उमेदवार आदेश मर्चंडे विजयी.
प्रभाग क्रमांक 14 बौध्दवाडी 2
अंजली मर्चंडे (अपक्ष) मते 37
रेश्मा मर्चंडे (अपक्ष) मते 59
अपक्ष उमेदवार रेश्मा मर्चंडे विजयी.
प्रभाग क्रमांक 15 गांधीचौक 2
वैशाली रेगे (अपक्ष) मते 37
प्रमिला कामेरीकर (राष्ट्रवादी) मते 22
अपक्ष उमेदवार वैशाली रेगे विजयी.
प्रभाग क्रमांक 16 गांधीचौक 1
वैभव कोकाटे(ऱाष्ट्रवादी) मते 48
मनोज अधिकारी(अपक्ष) मते 34
राष्ट्रवादीचे वैभव कोकाटे विजयी
प्रभाग क्रमांक 17 तुरेवाडी-सोनारवाडी
समृध्दी शिगवण (राष्ट्रवादी) मते 76
शारदा बने(अपक्ष)मते30
सोनल पवार(मनसे)मते28
राष्ट्रवादीच्या समृध्दी शिगवण विजयी.