कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील यांची एकहाती सत्ता

सांगली : कवठेमहांकाळ नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून पक्षाचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.



हा विजय सर्वसामान्यांचा


रोहित पाटील यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली असून म्हटले आहे की, “मी सर्वांचा आभारी आहे. सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती. राष्ट्रवादी पक्षावर झालेला अन्याय असो किंवा येथील प्रश्न असतील ते घेऊनच आम्ही निवडणूक लढलो आणि लोकांनी आम्हाला विजय मिळवून दिला. हा विजय सर्वसामान्यांचा आहे”.


“आम्ही लोकांसमोर विकासकामं घेऊन उतरलो होतो. लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समजून घेत होतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आणि त्यामुळेच हा विजय झाला,” असे रोहित पाटील म्हणाले.



आम्हा सर्वांना आबांची आठवण येते


निकालाच्या दिवशी माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही वक्तव्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “आबांच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याने आम्हाला सत्तेत बसवले आहे. आम्हा सर्वांना आबांची आठवण येत आहे. वडील ऐवजी चुकून बाप असा उल्लेख झाला होता. त्याच भाषणाचा धागा पकडत बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. आबांनी तसेच सुमनताईंच्या नेतृत्वात केलेले काम लोकांनी पाहिले असून त्यातूनच लोकांनी हा आशिर्वाद दिला आहे”.


आम्ही सर्वच कार्यकर्ते आबांची आठवण काढत आहोत, असे यावेळी ते म्हणाले. “आबा गेले तेव्हा मी दहावीत होतो. फारसा सहवास लाभला नाही, पण आज ते असते तर खूश झाले असते,” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.


रोहित पाटील यांनी निवडणुकीत केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीनंतर माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांच्या भावनिक सादेला जनतेने चांगला प्रतिसाद दिला असून विजय मिळवून दिला आहे. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment

Mahashivratri 2026: श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात देश-विदेशातून आलेल्या भाविकांची तुफान गर्दी

छत्रपती संभाजीनगर येथील बारावे ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र घृष्णेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त

"बंजारा समाजाला न्याय मिळणार; समाजाच्या आरक्षणासाठी आयोग स्थापन" - उपमुख्यमंत्री शिंदे

वाशीम: बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने आयोग स्थापन केला असून लवकरच समाजाला न्याय मिळेल, असा विश्वास

तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला

Mahashivratri 2026: जाणून घ्या शिवाच्या उपासनेमागील विज्ञान

मुंबई: महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी भगवान शिव यांची

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची अपडेट; सुनेत्रा वहिनी मनात कोणताही...

मुंबई: राज्याचे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र,

Mahashivratri 2026: मध्यरात्रीपासून शिवालय गजबजली; भाविकांची अलोट गर्दी

आज (रविवार, १५ फेब्रुवारी) देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडत आहे. या