Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीकवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील यांची एकहाती सत्ता

कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटील यांची एकहाती सत्ता

सांगली : कवठेमहांकाळ नगर पंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून पक्षाचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने १० जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे शेतकरी विकास पॅनल ६ आणि एका जागेवर अपक्ष निवडून आले आहेत.

हा विजय सर्वसामान्यांचा

रोहित पाटील यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली असून म्हटले आहे की, “मी सर्वांचा आभारी आहे. सर्वसामान्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती. राष्ट्रवादी पक्षावर झालेला अन्याय असो किंवा येथील प्रश्न असतील ते घेऊनच आम्ही निवडणूक लढलो आणि लोकांनी आम्हाला विजय मिळवून दिला. हा विजय सर्वसामान्यांचा आहे”.

“आम्ही लोकांसमोर विकासकामं घेऊन उतरलो होतो. लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी समजून घेत होतो. लोकांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आणि त्यामुळेच हा विजय झाला,” असे रोहित पाटील म्हणाले.

आम्हा सर्वांना आबांची आठवण येते

निकालाच्या दिवशी माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही वक्तव्यासंबंधी विचारण्यात आले असता ते म्हणाले की, “आबांच्या आणि राष्ट्रवादी पक्षाच्या विचारांना मानणाऱ्या कार्यकर्त्याने आम्हाला सत्तेत बसवले आहे. आम्हा सर्वांना आबांची आठवण येत आहे. वडील ऐवजी चुकून बाप असा उल्लेख झाला होता. त्याच भाषणाचा धागा पकडत बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. आबांनी तसेच सुमनताईंच्या नेतृत्वात केलेले काम लोकांनी पाहिले असून त्यातूनच लोकांनी हा आशिर्वाद दिला आहे”.

आम्ही सर्वच कार्यकर्ते आबांची आठवण काढत आहोत, असे यावेळी ते म्हणाले. “आबा गेले तेव्हा मी दहावीत होतो. फारसा सहवास लाभला नाही, पण आज ते असते तर खूश झाले असते,” अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

रोहित पाटील यांनी निवडणुकीत केलेला प्रचार चर्चेचा विषय ठरला होता. या निवडणुकीनंतर माझा बाप तुम्हाला आठवल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. त्यांचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांच्या भावनिक सादेला जनतेने चांगला प्रतिसाद दिला असून विजय मिळवून दिला आहे. यानिमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -