बीड : बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो. यंदा धनंजय मुंडे यांना भाजपने धक्का दिला आहे. बीडमधील पाचही नगरपंचायतींमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी बाजी मारली आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. फक्त पालकमंत्रीपद असून चालत नाही, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीला सत्ता असून देखील यश मिळवणं कठीण झालंय. भाजपला लोकांनी चांगली साथ दिली. बीडमध्ये सर्व नगरपंचायतींमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांचे मी अभिनंदन करते, असं मुंडे म्हणाल्या.
बीड जिल्ह्याच्या गेल्या अडीच वर्षातील लोकांचा रोष आणि अपेक्षांचा हा निकाल आहे. बीड जिल्ह्यामधील एकही आमदार दुसऱ्या मतदारसंघाचा विचार करत नाही. त्यामुळे सर्वांगीण विकास कोणी करत नाही, असं त्यांनी म्हटलं.