
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोकणातील नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली असून काही निकाल जाहीर झाले आहेत.
यामध्ये दापोली, मंडणगड, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, देवगड-जामसांडे, वाभवे-वैभववाडी व कसई-दोडामार्ग आणि रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींचा समावेश आहे.
या सर्व जागांवर विविध राजकीय पक्षांमधील मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. कुडाळमध्ये काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि देवगड या चारही नगरपंचायतीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. या चारही नगरपंचायतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत. भाजपने मात्र चारी नगरपंचायतमध्ये आपली सत्ता आणू असे म्हटले आहे. तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असा टोला मारला आहे. दोडामार्गमध्ये आमदार दीपक केसरकर याना मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपने त्याठिकाणी एकहाती सत्ता आणली आहे. तर कुडाळमध्ये काँग्रेसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. काँगेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर निर्णय घेऊ असं म्हटले आहे.
कुडाळ नगरपंचायतीत कॉंग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढून सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. तर स्थानिक पातळीवर कॉंग्रेसला सोबत घेऊन कुडाळ नगरपंचायतीत भाजप सत्ता स्थापन करू शकते. भाजपचे वरीष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील. कुडाळ नगरपंचायतीप्रमाणे देवगडमध्येही त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. चारही ठिकाणी भाजपची सत्ता येईल. काही ठिकाणी आम्हाला समविचारी पक्षांशी किंवा अन्य पक्षांचे सहकार्य घ्यावं लागेल. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला की चारही नगरपंचायतीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष बसतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गटनेते रणजीत देसाई यांनी दिली आहे.
कुडाळ नगरपंचायतीत भाजप 8 तर सेना 7
शिवसेना - 7 भाजप - 8 काँग्रेस- 2 राष्ट्रवादी - ० अपक्ष - ० इतर - ०देवगड जामसंडे नगरपंचायतीत सेना भाजप समसमान
शिवसेना - 8 भाजप - 8 काँग्रेस- ० राष्ट्रवादी - 1 अपक्ष - ० इतर - ०कसई दोडामार्ग नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व
भाजप - 12 शिवसेना - 2 अपक्ष - 2 राष्ट्रवादी - 1 काँग्रेस - ० इतर - ०वैभववाडी नगरपंचायतीत भाजपला 9 जागा
भाजप - 9 शिवसेना - 5 अपक्ष - 3 काँग्रेस - ० राष्ट्रवादी - ०- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत नगरपंचायतीत भाजपच्या ७ उमेदवारांचा विजय, शिवसेनेच्या वैभव नाईकांना राणेंचा धक्का
- देवगड नगरपंचायतीमध्ये भाजप ८ जागा, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेसचा एका जागेवर विजय; तर उर्वरित एका जागेच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
- कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजप ८ जागांवर विजयी, शिवसेनेच्या उमेदवारांची ७ जागांवर बाजी
- दापोली नगरपंचायतीमध्ये रामदास कदमांना धक्का, सुर्यकांत दळवी यांची सरशी
- दापोली नगरपंचायतीच्या ८ जागांचा निकाल जाहीर, ७ जागांवर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे उमेदवार विजयी
कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ निकाल
प्रभाग क्र. १ कविलकाटे (सर्वसाधारण महिला) १) सखु आकेरकर (भाजप) (विजयी) २) रंजना जळवी (काँग्रेस) ३) ज्योती जळवी (शिवसेना) विजयी
प्रभाग क्र. २ भैरववाडी (सर्वसाधारण महिला) १) नयना मांजरेकर (भाजप) (विजयी)
प्रभाग क्र.3 लक्ष्मीवाडी (सर्वसाधारण महिला) १) चांदणी कांबळी (भाजप) (विजयी) २)अश्विनी पाटील (शिवसेना)
प्रभाग क्र. ४ बाजारपेठ (सर्वसाधारण महिला) १) रेखा काणेकर (भाजप) २) श्रुती वर्दम (शिवसेना) विजयी ३) सोनल सावंत (काँग्रेस) ४) मृण्मयी धुरी (अपक्ष)
प्रभाग क्रमांक ५ कुडाळेश्वर वाडी (सर्वसाधारण) १) अभिषेक गावडे (भाजप) (विजयी) २) प्रवीण राऊळ (शिवसेना) ३) सुनील बांदेकर (अपक्ष) ४) रमाकांत नाईक (मनसे) ५) रोहन काणेकर (काँग्रेस)
प्रभाग क्र. ६ गांधीचौक (सर्वसाधारण महिला) १) प्राजक्ता बांदेकर (भाजप) (विजयी) २) देविका बांदेकर (शिवसेना) ३) शुभांगी काळसेकर (काँग्रेस) ४) आदिती सावंत (अपक्ष )
प्रभाग क्र. ७ डाॅ. आंबेडकर नगर (सर्वसाधारण) १) विलास कुडाळकर (भाजप) (विजयी) २) भूषण कुडाळकर (शिवसेना) ३) मयूर शारबिद्रे (काँग्रेस
प्रभाग क्र. ८ मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महिला) १) मानसी सावंत (राष्ट्रवादी काँग्रेस) (विजयी) २) रेवती राणे (भाजप) ३) आफरीन करोल (काँग्रेस)
प्रभाग क्र. 9 नाबरवाडी (सर्वसाधारण महिला), १) साक्षी सावंत (भाजप) २) श्रेया गवंडे (शिवसेना) विजयी
प्रभाग क्र 10 केळबाईवाडी (सर्वसाधारण महिला) १) प्रांजल कुडाळकर (शिवसेना), २) रीना पडते (भाजप) ३) अक्षता खटावकर (काँग्रेस) (विजयी)
प्रभाग क्र. ८ मस्जिद मोहल्ला (सर्वसाधारण महिला) १) मानसीसावंत २) रेवती राणे (भाजप) ३) आफरीन करोल (काँग्रेस) विजयी