कणकवली : माईण ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी एका जागेसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपचे नितीन पाडावे ४५, श्रीकृष्ण घाडीगांवकर २८ आणि नोटा ३ असे मतदान झाले. त्यात नितीन पाडावे यांचा १७ मतांनी विजय झाला आहे.
तर जानवली ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी मतमोजणी झाली. भाजपचे संतोष महादेव कारेकर यांचा दमदार विजय झाला आहे. यामध्ये भालचंद्र दळवी १२१ व संतोष कारेकर २९७ मते आणि नोटा -३ असे मतदान झाले. त्यामुळे १७६ मतांनी श्री. कारेकर यांचा विजय झाला.
कळसुली ग्रामपंचायत प्रभाग ४ मधील पोटनिवडणुकीत महा विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.चंद्रशेखर मधुकर चव्हाण ,प्रगती प्रमोद भोगले या दोन्ही जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे.
कळसुलीच्या प्रभाग ४ मधील दोन जागेसाठी चंद्रशेखर चव्हाण २२०, प्रसाद कानडे १८७,नोटा ५ असे मतदान झाले आहे . तसेच प्रगती प्रमोद भोगले २१३, राधिका राधाकृष्ण वारंग १७५ ,नोटा-११ असे मतदान झाले.
निवडणूक मतमोजणी कणकवली तहसील कार्यालय येथे तहसीलदार रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी बाळकृष्ण परब यांनी निकाल जाहीर केले.