Saturday, July 5, 2025

वाभवे–वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा : सेनेचा दारुण पराभव

वाभवे–वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा : सेनेचा दारुण पराभव

वैभववाडी : वाभवे वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. १७ पैकी ९ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. तर भाजपा पुरस्कृत एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. विजया नंतर पक्ष कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.


नितेश राणे आगे बढो.. हम तुम्हारे साथ है.. अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी शहर दणाणून सोडले. भाजपा नगरसेवकांची संख्या १० झाली आहे.


एकूण १७ जागा मध्ये भाजपा ९, शिवसेना ५, अपक्ष ३ यांनी विजय संपादित केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >