Sunday, June 22, 2025

देशात दिवसभरात २ लाख ८२ हजार नवे रुग्ण; ४४१ जणांचा मृत्यू

देशात दिवसभरात २ लाख ८२ हजार नवे रुग्ण; ४४१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतातील कोरोना संसर्गाचा वेग वाढत असून केंद्राने कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णांची संख्या दर दिवशी अडीच लाख आणि त्याहून जास्त आढळत आहे. गेल्या २४ तासात भारतात २ लाख ८२ हजार ९७० इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ४४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.


काल दिवसभरात १ लाख ८८ हजार १५७ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या देशात १८ लाख ३१ हजार इतके सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १५.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी देशात तब्बल ४४ हजार ८८९ नवे रुग्ण आढळून आले.


देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरिअंटच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. आतापर्यंत ८ हजार ९६१ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. मंगळवारी ०.७९ टक्के नवे रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

Comments
Add Comment