भंडारा : मोदी नावाच्या गावगुंडाला भंडारा पोलिसांनी अटक केल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. पण त्यांचा हा दावा भंडारा पोलिसांनी खोडून काढल्याने आता पटोले यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. आम्ही मोदी नावाच्या कोणालाही अटक केलेली नाही, असे स्पष्टीकरण भंडारा पोलिसांनी दिले आहे.
नाना पटोलेंचा दावा खोडून काढताना भंडारा पोलिसांनी सांगितले की, “सोळा तारखेच्या घटनेबाबत सोशल मीडियावर ज्या अनेक प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत. त्या संदर्भात पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. या घटनेबाबत आम्ही चौकशी करत आहोत. या चौकशीत जे काही निष्पण्ण होईल त्यावर पुढील कायदेशीर कारवाई होईल. याबाबत चौकशीचे निष्कर्ष नंतर कळवले जातील, असे ते म्हणाले.