कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते, विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले.
यावेळी ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनीही दिवंगत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी दिवंगत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास पाटील यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य, खासदार, आमदार, शिक्षण, सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, नागरिक यांनीही प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दिवंगत नेते पाटील यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिवंगत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.