Wednesday, May 21, 2025

महाराष्ट्रराजकीयमहत्वाची बातमी

मोदींवर टीका करणाऱ्या नाना पटोलेंना अटक करा- नितीन गडकरी

मोदींवर टीका करणाऱ्या नाना पटोलेंना अटक करा- नितीन गडकरी

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नितीन गडकरी यांनी ट्विट करून यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मोदींबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर नाना पटोले यांच्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, असे ट्विट गडकरी यांनी केले आहे.


https://twitter.com/nitin_gadkari/status/1483133109797535746?ref_src

नाना पटोले यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 'मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' असं वक्तव्य करताना पटोले दिसत आहेत. यानंतर भाजप नेत्यांनी नाना पटोलेंवर टीकेची झोड उठवली आहे. नाना पटोले यांनी यानंतर स्पष्टीकरण दिले आहे. मी कोणतेही भाषण देत नव्हतो. भंडारा जिल्ह्यात मोदी नावाचा एका गुंड आहे. त्याच्याविषयी बोलत होतो, असे स्पष्टीकरण पटोले यांनी दिले आहे.


नाना पटोले यांच्यावर फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाचे चाललेय तरी काय? स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते!' असं ट्वीट फडणवीस यांनी करत, पटोले यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

Comments
Add Comment