चंदिगड : पंजाबमध्ये (Punjab) १४ फेब्रुवारीला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे (Election Comission) धाव घेतली आहे. १४ फेब्रुवारीला होणारे मतदान पुढे ढकलण्याची मागणी भाजप (BJP), काँग्रेससह (Congress) अनेक पक्षांनी केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, भाजप आणि बसपा यांनी निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र लिहिले आहे.
निवडणूक पुढे ढकलण्याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, १६ फेब्रुवारीला संत रविदास जयंती आहे. पंजाबमध्ये लाखो भाविक त्यांची पूजा करण्यासाठी वाराणसीला जातील. अशा स्थितीत ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीची तारीख बदलण्यात यावी.
राजकीय पक्षांनी केलेल्या विनंतीवर आज निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावर निवडणूक आयोग सध्या चर्चा करत असून निवडणूक पुढे ढकलणार की आहे त्याच दिवशी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.