
नवी दिल्ली : भारतात गेल्या २४ तासात २ लाख ५८ हजार ८९ कोरोना केसेसची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत १३,११३ ने केसेस कमी झाल्या आहेत. तर, चोवीस तासात ३८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यासोबतच एक लाख ५१ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1482926484474175489
सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १६ लाख ५६ हजार ३४१ वर गेली आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट ११९.६५ टक्के झाला आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णंसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. देशात ८ हजार २०९ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली आहे.