Sunday, January 25, 2026

अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण माने या सोंगाड्यावर कारवाई करा - चित्रा वाघ

अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण माने या सोंगाड्यावर कारवाई करा - चित्रा वाघ

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्रीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेते किरण माने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले आहे. सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडल्याने आपल्याला मालिकेमधून काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केला. यानंतर काही जण किरण माने यांना पाठिंबा देत आहेत. तर, काही जण त्यांच्यावर टीकाही करत आहे.

https://twitter.com/ChitraKWagh/status/1482926029052452867

मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीशी गैरवर्तन करणा-या किरण मानेला प्रोडक्शन हाउसनं हाकलून दिलयं.. मग मानेनं नवं नाट्य उभं केलं. महिलांचा विनयभंग व पीएम वर विखारी टिका करणा-या हरामखोराला सत्ताधारी पाठीशी घालताहेत.

कोण आहेत मानेचे बोलवते धनी ??

या सोंगाड्यावर कारवाई करा..

शिक्षा झालीचं पाहीजे, अशी पोस्ट करत चित्रा वाघ यांनी कारवाईची मागणी केली आहे.

Comments
Add Comment