Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

पवई आयआयटी हॉस्टेलमधील विद्यार्थ्याने केली आत्महत्या

पवई आयआयटी हॉस्टेलमधील विद्यार्थ्याने केली आत्महत्या

मुंबई : पवई आयआयटीमध्ये दर्शन मालवीया (वय २६) या विद्यार्थ्याने हॉस्टेल इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.


मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन मालवीया हा मूळचा मध्य प्रदेशातील इंदोरचा राहणारा होता. सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने उडी मारल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पवई पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


तणावात त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. त्याचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment