Thursday, October 30, 2025
Happy Diwali

महिलेच्या हत्येमुळे डोंबिवलीत खळबळ

महिलेच्या हत्येमुळे डोंबिवलीत खळबळ

डोंबिवली : घरात घुसून अज्ञात मारेकऱ्याने एका ५८ वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्व परिसरात असलेल्या टिळकनगर चौकातील आनंद शीला या सोसायटीत घडली आहे.

याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्या अज्ञात मारेकऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. विजया बावीस्कर (५८) असे हत्या झालेल्या या महिलेचे नाव आहे. मृत विजया या टिळकनगर चौकातील आनंद शीला सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरात एकट्याच राहत होत्या. रात्रीच्या सुमारास घरात घुसून या महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

सोमवारी सकाळी घरकाम करणारी महिला मृत विजया यांच्या घरात आली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती टिळकनगर पोलीस ठाण्याला दिली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत विजया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला.

Comments
Add Comment