नवी दिल्ली : कथक नृत्यशैलीचे महान नर्तक आणि नृत्य अध्यापक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला.
भारतीय नृत्य कला को विश्वभर में विशिष्ट पहचान दिलाने वाले पंडित बिरजू महाराज जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। उनका जाना संपूर्ण कला जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और प्रशंसकों के साथ हैं। ओम शांति! pic.twitter.com/PtqDkoe8kd
— Narendra Modi (@narendramodi) January 17, 2022
ट्वीटरद्वारे आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” भारतीय नृत्यकलेला साऱ्या जगात विशेष ओळख मिळवून देणारे आदरणीय पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने अतिशय दुःख होत आहे. त्यांचे देहावसान ही संपूर्ण कलाजगतासाठी कदापि भरून न येणारी हानी आहे. या शोकप्रद प्रसंगी त्यांचे आप्तस्वकीय आणि प्रशंसक यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शांती.” अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कथ्थक नृत्यकार पंडित बिरजू महाराज यांचे निधन
पंडित बिरजू महाराज यांचे निधन देशासाठी अपूरणीय क्षती : नितीन गडकरी
पंडित बिरजू महाराज यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
ट्वीटरद्वारे नितीन गडकरी म्हणाले, “भारतीय कला-संस्कृतीस कथ्थक नृत्यशैलीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात प्रसिद्धी प्रदान करणारे कथ्थक सम्राट पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज जी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. पंडित बिरजू महाराज जी यांचे निधन संपूर्ण जग तसेच देशासाठी अपूरणीय क्षती आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो तसेच परिजनांना बळ देवो. ॐ शांती.”
भारतीय कला-संस्कृति को कथक नृत्य शैली के माध्यम से संपूर्ण विश्व में प्रसिद्धि दिलाने वाले कथक सम्राट पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज जी का निधन अत्यंत दुःखद है। उनको मेरी भावभीनी श्रद्धांजलि।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 17, 2022