अरे बापरे! ओमायक्रॉन हा कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी?

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (Corona virus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) जगभरात प्रसार झाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या नव्या व्हेरिएंटवर रिसर्च करत असताना व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर टी जॅकब जॉब यांनी मात्र ओमायक्रॉनबाबत खळबळजनक दावा केला आहे. ओमायक्रॉन हा कोरोना महामारीपेक्षा वेगळा आहे आणि यामुळे या दोन वेगवेगळ्या महामारी एकसोबतच पसरत असल्याचे आपण मानायला हवे, असे डॉक्टर टी जॅकब जॉब यांनी म्हटले आहे.


डॉ. जॅकब जॉन म्हणाले, की ओमायक्रॉन वुहान-डी 614 जी, अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, कप्पा किंवा म्यूद्वारे उत्पन्न झालेला नाही आणि हे निश्चित आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या 'सेंटर ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजी'चे माजी संचालक जॉन म्हणाले, 'माझ्या मते हा अज्ञात वंशाचा प्रकार आहे, परंतु तो वुहान-डी 614G शी संबंधित आहे.


ते म्हणाले की D614G या प्रोटीनमध्ये अमीनो ऍसिड म्यूटेशन दर्शविते, जे जगभरातील SARS-CoV-2 विषाणूमध्ये वाढत्या प्रमाणात सामान्य झाले आहे. दोघांमुळे होणारे आजारही वेगवेगळे आहेत. एक म्हणजे न्यूमोनिया-हायपोक्सिया-मल्टीऑर्गन डॅमेज डिसीज, तर दुसरा श्वसन रोग आहे.


काही ठिकाणी कोरोनाची प्रकरणं कमी होऊ लागली आहेत, अशात तिसरी लाट शिगेला पोहोचली आहे का, असं विचारलं असता जॉन म्हणाले की संक्रमण पहिल्यांदा महानगरांमध्ये सुरू झालं आणि ते तिथेच आधी संपेल. ते म्हणाले की, 'या सगळ्या मिळून राष्ट्रीय महामारी आहेत.'


कोरोना विषाणूचा अत्यंत संसर्गजन्य प्रकार असलेल्या ओमायक्रॉनमुळे भारतात कोविड-19 महामारीची तिसरी लाट सुरू आहे.


देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,५८,०८९ रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच देशात ८ हजार २०९ ओमायक्रॉन रुग्ण आढळले. शुक्रवारच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये ६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


देशात सध्या १६ लाख ५६ हजार ३४१ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ११९.६५ टक्के आहे. तर, देशातील रिकव्हरी रेट सध्या ९४.२७ टक्के आहे. देशात आतापर्यंत १५७.२० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७०.३७ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ७४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ३७ हजार ४६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर