Tuesday, July 23, 2024
Homeदेशअरे बापरे! ओमायक्रॉन हा कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी?

अरे बापरे! ओमायक्रॉन हा कोरोनाचा व्हेरिएंट नसून वेगळी महामारी?

व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर टी जॅकब जॉब यांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा (Corona virus) नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा (Omicron) जगभरात प्रसार झाला आहे. जगभरातील शास्त्रज्ञ या नव्या व्हेरिएंटवर रिसर्च करत असताना व्हायरोलॉजिस्ट डॉक्टर टी जॅकब जॉब यांनी मात्र ओमायक्रॉनबाबत खळबळजनक दावा केला आहे. ओमायक्रॉन हा कोरोना महामारीपेक्षा वेगळा आहे आणि यामुळे या दोन वेगवेगळ्या महामारी एकसोबतच पसरत असल्याचे आपण मानायला हवे, असे डॉक्टर टी जॅकब जॉब यांनी म्हटले आहे.

डॉ. जॅकब जॉन म्हणाले, की ओमायक्रॉन वुहान-डी 614 जी, अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, कप्पा किंवा म्यूद्वारे उत्पन्न झालेला नाही आणि हे निश्चित आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या ‘सेंटर ऑफ अॅडव्हान्स्ड रिसर्च इन व्हायरोलॉजी’चे माजी संचालक जॉन म्हणाले, ‘माझ्या मते हा अज्ञात वंशाचा प्रकार आहे, परंतु तो वुहान-डी 614G शी संबंधित आहे.

ते म्हणाले की D614G या प्रोटीनमध्ये अमीनो ऍसिड म्यूटेशन दर्शविते, जे जगभरातील SARS-CoV-2 विषाणूमध्ये वाढत्या प्रमाणात सामान्य झाले आहे. दोघांमुळे होणारे आजारही वेगवेगळे आहेत. एक म्हणजे न्यूमोनिया-हायपोक्सिया-मल्टीऑर्गन डॅमेज डिसीज, तर दुसरा श्वसन रोग आहे.

काही ठिकाणी कोरोनाची प्रकरणं कमी होऊ लागली आहेत, अशात तिसरी लाट शिगेला पोहोचली आहे का, असं विचारलं असता जॉन म्हणाले की संक्रमण पहिल्यांदा महानगरांमध्ये सुरू झालं आणि ते तिथेच आधी संपेल. ते म्हणाले की, ‘या सगळ्या मिळून राष्ट्रीय महामारी आहेत.’

कोरोना विषाणूचा अत्यंत संसर्गजन्य प्रकार असलेल्या ओमायक्रॉनमुळे भारतात कोविड-19 महामारीची तिसरी लाट सुरू आहे.

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,५८,०८९ रुग्ण आढळले आहेत. त्यासोबतच देशात ८ हजार २०९ ओमायक्रॉन रुग्ण आढळले. शुक्रवारच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये ६.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, ३८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्या १६ लाख ५६ हजार ३४१ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. देशात दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ११९.६५ टक्के आहे. तर, देशातील रिकव्हरी रेट सध्या ९४.२७ टक्के आहे. देशात आतापर्यंत १५७.२० कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर आतापर्यंत एकूण ७०.३७ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत १ लाख ५१ हजार ७४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ३ कोटी ५२ लाख ३७ हजार ४६१ जण कोरोनातून बरे झाले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -