Friday, October 4, 2024
Homeदेशलसीकरण मोहिमेशी संबंधित प्रत्येकाची भूमिका अनन्यसाधारण : पंतप्रधान मोदी

लसीकरण मोहिमेशी संबंधित प्रत्येकाची भूमिका अनन्यसाधारण : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (हिं.स) : देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला तसेच लसीकरण मोहिमेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचे अभिवादन केले.

ट्वीटरद्वारे आपले विचार मांडताना पंतप्रधान म्हणाले, “लसीकरण मोहिमेला एक वर्ष झाले. लसीकरण मोहिमेशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी अभिवादन करतो.

आपल्या लसीकरण कार्यक्रमाने कोविड-19 विरुद्धच्या लढ्याला मोठे बळ मिळाले आहे. यामुळे जीव वाचले आहेत आणि उपजीविका राखल्या गेल्या. यात आपले चिकित्सक, परिचारिका आणि आरोग्यसेवा कर्मचार्यांची भूमिका अनन्यसाधारण आहे. जेव्हा आपण दुर्गम भागात लसीकरण करत असलेल्या लोकांची किंवा आपले आरोग्य कर्मचारी तेथे लस घेऊन जातात, ती क्षणचित्रे पाहतो तेव्हा हृदय आणि मन अभिमानाने भरून येते.

महामारीविरुद्ध लढण्याचा भारताचा दृष्टीकोन नेहमीच विज्ञानावर आधारित राहील. आपल्या नागरिकांना योग्य देखभाल मिळावी यासाठी आम्ही आरोग्यविषयक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहोत. चला, आपण सर्व कोविड-19 संबंधित नियमांचे पालन करत राहू आणि महामारीवर मात करू.”

परीक्षा पे चर्चा ‘ कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाविषयी ट्वीट केले असून, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात आपल्याला देशातील ऊर्जावान युवकांशी संवाद साधण्याची, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या आकांक्षा समजून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

“परीक्षा जवळ येत आहेत, त्याचप्रमाणे ‘परीक्षा पे चर्चा-2022’ देखील जवळ येत आहे. चला आपण तणावमुक्त परीक्षांबद्दल बोलू या आणि पुन्हा एकदा आपल्या निर्भय #ExamWarriors, ना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना पाठबळ देऊया यंदाच्या #PPC2022 साठी आपण नोंदणी करावी, असे मी तुम्हाला आवाहन करतो.

माझ्यासाठी, वैयक्तिकदृष्ट्या, ‘परीक्षा पे चर्चा’ हा नवे काहीतरी शिकवणारा विलक्षण अनुभव असतो. या माध्यमातून, मला देशातल्या ऊर्जावान युवाशक्तीशी संवाद साधण्याची, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या आकांक्षा नीट समजून घेण्याची संधी मिळते. तसेच शिक्षणाच्या जगात नवे के उपक्रम सुरु आहेत, त्याची माहिती घेण्याचीही ही संधी आहे. #PPC2022″, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

कोरोना लसीकरण अभियान जगासाठी एक आदर्श : अमित शाह

कोरोना लसीकरण अभियानाच्या वर्षपूर्ती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन आणि कौतुक केले .

ट्वीटरद्वारे अमित शाह म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मजबूत व प्रेरक नेतृत्वात कोरोना विरुद्ध लढाईत विश्वातील सर्वात मोठ्या आणि विनामूल्य लसीकरण अभियानाच्या यशस्वी वर्षपूर्ती निमित्त देशाच्या प्रतिभावान वैज्ञानिक, आरोग्य कर्मचारी, सर्व कोरोना योध्ये आणि देशवासियांचे अभिनंदन.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कुशल नेतृत्व, दृढ संकल्प व निरंतर प्रयासाद्वारे भारताने जगात एक आदर्श स्थापित केला आहे. जर सरकार व नागरिक देशहितासाठी एकजुट होत एकत्रित लक्ष्य ठेवतील तर कशा प्रकारे देश प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करीत असंभवही संभव करू शकतात.”

लसीकरण मोहिमेत योगदान द्या : नितीन गडकरी

कोरोना लसीकरण अभियानाच्या वर्षपूर्ती निमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आनंद व्यक्त केला. ट्वीटरद्वारे नितीन गडकरी म्हणाले, ” कोरोना विरुद्ध भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संचालित जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाने यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केले. या महत्वपूर्ण उपलब्धीसाठी सर्व देशवासियांचे अभिनंदन. कोरोना विरुद्ध या लढाईत आपले योगदान द्या आणि आपली वेळ आल्यावर लसीकरण अवश्य करून घ्या. ” असे आवाहन गडकरी यांनी केलेय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -