नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाविषयी ट्वीट केले असून, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात आपल्याला देशातील ऊर्जावान युवकांशी संवाद साधण्याची, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या आकांक्षा समजून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
“परीक्षा जवळ येत आहेत, त्याचप्रमाणे ‘परीक्षा पे चर्चा-२०२२’ देखील जवळ येत आहे. चला आपण तणावमुक्त परीक्षांबद्दल बोलू या आणि पुन्हा एकदा आपल्या निर्भय #ExamWarriors, ना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना पाठबळ देऊया यंदाच्या #PPC2022 साठी आपण नोंदणी करावी, असे मी तुम्हाला आवाहन करतो.
माझ्यासाठी, वैयक्तिकदृष्ट्या, ‘परीक्षा पे चर्चा’ हा नवे काहीतरी शिकवणारा विलक्षण अनुभव असतो. या माध्यमातून, मला देशातल्या ऊर्जावान युवाशक्तीशी संवाद साधण्याची, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या आकांक्षा नीट समजून घेण्याची संधी मिळते. तसेच शिक्षणाच्या जगात नवे के उपक्रम सुरु आहेत, त्याची माहिती घेण्याचीही ही संधी आहे. #PPC2022 , असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुंबई : संजू राठोडने (Sanju Rathod) गायलेले 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं प्रचंड लोकप्रिय…
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…