Monday, May 5, 2025

देशमहत्वाची बातमी

'परीक्षा पे चर्चा २०२२' कार्यक्रमात सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

'परीक्षा पे चर्चा २०२२' कार्यक्रमात सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाविषयी ट्वीट केले असून, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात आपल्याला देशातील ऊर्जावान युवकांशी संवाद साधण्याची, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या आकांक्षा समजून घेण्याची संधी मिळते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

"परीक्षा जवळ येत आहेत, त्याचप्रमाणे 'परीक्षा पे चर्चा-२०२२' देखील जवळ येत आहे. चला आपण तणावमुक्त परीक्षांबद्दल बोलू या आणि पुन्हा एकदा आपल्या निर्भय #ExamWarriors, ना, त्यांच्या पालकांना आणि शिक्षकांना पाठबळ देऊया यंदाच्या #PPC2022 साठी आपण नोंदणी करावी, असे मी तुम्हाला आवाहन करतो.

माझ्यासाठी, वैयक्तिकदृष्ट्या, ‘परीक्षा पे चर्चा’ हा नवे काहीतरी शिकवणारा विलक्षण अनुभव असतो. या माध्यमातून, मला देशातल्या ऊर्जावान युवाशक्तीशी संवाद साधण्याची, त्यांच्यासमोरील आव्हाने आणि त्यांच्या आकांक्षा नीट समजून घेण्याची संधी मिळते. तसेच शिक्षणाच्या जगात नवे के उपक्रम सुरु आहेत, त्याची माहिती घेण्याचीही ही संधी आहे. #PPC2022 , असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Comments
Add Comment