Monday, June 30, 2025

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स करणार ८०० कोटींची गुंतवणूक

मलाबार गोल्ड अँड डायमंड्स करणार ८०० कोटींची गुंतवणूक

मुंबई : जगातील सर्वात मोठा ज्वेलरी समूह बनण्याच्या उद्देशाने, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स जागतिक स्तरावर जलद विस्तार प्रकल्प राबवत आहे. नववर्षात जागतिक विस्ताराच्या योजनांचा एक भाग म्हणून, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सकडून ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारीमध्ये भारतासह परदेशात मिळून २२ नवीन शोरूम्स उघडली जाणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे मलाबारकडून देशात पहिल्यांदाच आभूषण किरकोळ विक्रेता शृंखला एवढ्या मोठ्या संख्येने शोरूम्स एकत्र उघडत आहे.


मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने २०२३ वर्षअखेर एकूण शोरूमची संख्या ७५० पर्यंत वाढविणे आणि जगातील प्रथम क्रमांकाचे सोन्याच्या आभूषणांचे विक्रेता बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे. नियोजित विस्तार कार्यक्रमामुळे दागिन्यांच्या व्यापाराशी संबंधित किरकोळ विक्री, उत्पादन, तांत्रिक आणि व्यवस्थापन क्षेत्रात आणखी ५,००० रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मलाबार समूहाचे अध्यक्ष एम. पी. अहमद यांनी सांगितले.


मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे १० देशांमध्ये विक्री दालनांचे मजबूत अस्तित्व आहे. याशिवाय, समूहाचे १४ घाऊक युनिट्स आणि नऊ दागिने घडविण्याचे युनिट्स भारतात आणि परदेशात आहेत. कंपनीची वार्षिक उलाढाल ४.५१ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.

Comments
Add Comment