Friday, June 13, 2025

भाजपला हरवणे, येऱ्या गबाळ्याचे काम नाही

भाजपला हरवणे, येऱ्या गबाळ्याचे काम नाही

कल्याण : उत्तर प्रदेशात भाजपमधून जे नेते चालले आहेत, त्यामुळे भाजपला फटका बसेल असे अजिबात नाही, उलट जे भाजप सोडून जात आहेत त्यांचेच नुकसान होईल. भाजपला काही फरक पडणार नाही. भाजप ३०० जागा जिंकणार. विरोधकांसह अखिलेश यादव यांनी किती प्रचार केला तरी भाजपला हरवणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही, असा टोला केंदीय मंत्री रामदास आठवले यांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांना लगावला आहे.


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे कल्याणनजीक गोवेली येथील जीवनदीप कॉलेजमध्ये प्राचार्य धनाजी गुरव यांच्या शोकसभेसाठी आले होते. या कार्यक्रमात भाजप आमदार किसन कथोरे, कॉलेज संचालक रवींद्र घोडविंदे आणि रिपाईचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी अखिलेश यादव यांना टोला लागावला. तसेच अन्य राजकीय मुद्यावर मत मांडले.


मते खाण्याच्या राजकारणापेक्षा मते घेऊन निवडून येण्याचे राजकारण करण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी विचार करावा, असा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी असा सल्ला दिला.

Comments
Add Comment