Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीफणसाड अभयारण्यात झाली पक्षी गणना

फणसाड अभयारण्यात झाली पक्षी गणना

पक्षी प्रेमींनी घेतला विविध पक्षी पहाण्याचा आनंद

  • नितीन शेडगे

मुरुड जंजिरा : मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध अशा फणसाड अभयारण्यात पक्षी प्रेमी संघटना व फणसाड अभयारण्याचा कर्मचारी वृंदाने अथक परिश्रम करून तीन दिवसात ५४ चौरस किलोमीटर परिसर पिंजून काढून विविध पक्षी शोधून काढून त्याची माहिती प्रशासनास सादर केली आहे. त्यामुळे फणसाडचे गत वैभव वाढले असून पक्षांची संख्याही वाढती असल्याचे दिसून येत आहे.समुद्र सपाटीपासून अगदी जवळ व महाराष्ट्रातील एकमेव अभयारण्य म्हणजे फणसाड अभयारण्य आहे.येथे विविध वन्य जीव ,विविध औषधी वनस्पती,पक्षी यांचा मोठा साठा आढळून आल्याने पर्यटकांची पावले येथे फिरत आहेत. महाराष्ट्र वनविभाग आणि ग्रीन वर्कस् ट्रस्ट यांनी एकत्रितरित्या जानेवारी महिन्यात तीन दिवसांचे फणसाड वन्यजीव अभयारण्य येथे तिसऱ्या पक्षी गणनेचे आयोजन केले होते. कोरोना संबंधित पूर्ण दक्षता घेऊन ही गणना पार पाडण्यात आली. वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता ४५ ऐवजी २८ पक्षी निरीक्षक या उपक्रमात सहभागी झाले.

तीन दिवसांच्या कालावधीत येथे १६२ पक्ष्यांची नोंद करण्यात आली. केंटीश प्लोव्हर, ब्लुइथ्रोट , पडद्यफिएल्ड वॉरब्लेर , येल्लोव -ब्रॉवेद वॉरब्लेर या पक्ष्यांची नोंद पहिल्यांदाच अभयारण्यात झाली. पक्ष्यांव्यतिरिक्त इंडियन फॉरेस्ट स्कॉर्पिओन, इंडियन व्हीओलेतं टारांटूला , बर्ड द्रोपंपींग स्पायडर, ग्रीन हुंट्स्मन स्पायडर या दुर्मिळ अष्टपाद प्राण्यांचे दर्शन झाले.

महाराष्ट्रात गुहागरपासून दक्षिणेला दिसणाऱ्या भिमपंखी या भारतातील सर्वात मोठ्या फुलपाखराचे दर्शन दुसऱ्या पक्षी गणनेत सुद्धा झाले आहे.. यंदा हे फुलपाखरू पक्षी गणनेदरम्यान ५ वेगवेगळ्या ठिकाणी दिसले. शिवाय डार्क पीएर्रोट, थ्री -स्पॉट ग्रास येल्लोव, स्पॉटलेस ग्रास येल्लोव या ही दुर्मिळ फुलपाखरे देखील दिसले आहेत. याबाबत अधिक माहिती सांगताना फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले यांनी सांगितले.कि,ग्रीन वर्कस् ट्रस्ट चे सर्व सहकारी व फणसाड अभयारण्यातील कर्मचारी वृंदानी तीन दिवसात फणसाड च्या विविध ठिकाणी जाऊन विविध पक्षांची नोंद घेतली आहे.पक्षी गणना हि खूप आवश्यक असून यामुळे अभयारण्यात असणाऱ्या पक्षांच्या विविध जाती कळतात.त्याची प्रसिद्धी झाल्याने पर्यटक व पक्षी प्रेमी येथे आवर्जून भेट देतात.त्यामुळे फणसाड च्या महसूल वाढीला मोठा हातभार लागत असतो.गर्दीपासून दूर शांत व उंच वृक्षांची दाटी यामुळे असंख्य पर्यटक येथील सौदर्य विविधता पाहण्यासाठी येत असतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -