Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

उपराष्ट्रपती नायडूंनी साजरा केला 'भोगी' सण

उपराष्ट्रपती नायडूंनी साजरा केला 'भोगी' सण
चेन्नई  : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी चेन्नईत सपत्नीक भोगी सण साजरा केला. उपराष्ट्रपती नायडूंनी पारंपारिक वस्त्र परिधान करून परिवारातील सदस्यांसोबत भोगी- होळीची पूजा केली. ट्वीटरद्वारे उपराष्ट्रपती म्हणाले, " भोगीच्या सर्वांना शुभेच्छा. भोगी सण आपणास जीवनात नूतन सकारात्मक परिवर्तन स्वीकार करण्याचे महत्व तसेच सभोवताली असलेली नकारात्मकता बाजूला सारण्याची आठवण करून देतो. पवित्र ' भोगी मंटलु ' सर्वांचे जीवन प्रज्वलित करून नवीन आशा, आनंद आणि शांती प्रदान करो. " मागील वर्षी उपराष्ट्रपती नायडूंनी पणजी येथील राजभवनात कुटुंबातील सदस्यांसोबत भोगी सण साजरा केला होता. भोगी सण प्रामुख्याने आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात साजरा केला जातो. तीन दिवसांच्या संक्रांती उत्सवाला भोगी पासून सुरवात होते. तेलुगू राज्यात संक्रांतीला फार महत्व आहे. यास 'पेद्दा पंडगा ' देखील संबोधले जाते. जगभरातील तेलुगू बांधव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा